
Sunday, November 19, 2006
तु + मी = ?
तु + मी = ?
तु अधिक मी बरोबर काय?
असे तु मला अनपेक्षितपणे विचारलेस
तेव्हा मी शांतच राहीलो..कारण
उत्तर अवघड होते म्हणून नव्हे
उत्तर तुलाही माहित होते म्हणुनच...
तरीही तु मला विचारतच राहिलीस..
आणि मीही विचार करतच....
तु अधिक मी बरोबर काय?
किती किती म्हणुन उत्तरे देऊ...
तु अधिक मी जणु आकाश अन धरा
तु अधिक मी जणु नदी अन झरा....
तु अधिक मी जणु तारुण्य अन सौंदर्य
तु अधिक मी जणु मधु अन माधुर्य.....
तु अधिक मी जणु राजहंसाची जोडी
तु अधिक मी जणु मालकंसाची गोडी.....
तु अधिक मी जणु वारकरी अन देव
तु अधिक मी जणु मर्मबंधातली ठेव.....
तु अधिक मी जणु ताटीचे अभंग
तु अधिक मी जणु भक्त नामात दंग....
तु अधिक मी जणु श्रावणाची हळुवार चाहूल
तु अधिक मी जणु जोहरची अंजली अन राहुल....
तु अधिक मी जणु अनुरेणुंतुन पाझरनारी प्रिती
तु अधिक मी जणु नवयुगुलांची गोडसर भीती....
तुझ्याविना माझे जगणे, सखे, जगणेच धरत नाही,
आपल्या नात्यामधे असले गणित, मी कधीच करत नाही,
कारण...
तु वजा जाता माझा मीच उरत नाही...
तु वजा जाता माझा मीच उरत नाही...
- अविनाश पेठकर
तु अधिक मी बरोबर काय?
असे तु मला अनपेक्षितपणे विचारलेस
तेव्हा मी शांतच राहीलो..कारण
उत्तर अवघड होते म्हणून नव्हे
उत्तर तुलाही माहित होते म्हणुनच...
तरीही तु मला विचारतच राहिलीस..
आणि मीही विचार करतच....
तु अधिक मी बरोबर काय?
किती किती म्हणुन उत्तरे देऊ...
तु अधिक मी जणु आकाश अन धरा
तु अधिक मी जणु नदी अन झरा....
तु अधिक मी जणु तारुण्य अन सौंदर्य
तु अधिक मी जणु मधु अन माधुर्य.....
तु अधिक मी जणु राजहंसाची जोडी
तु अधिक मी जणु मालकंसाची गोडी.....
तु अधिक मी जणु वारकरी अन देव
तु अधिक मी जणु मर्मबंधातली ठेव.....
तु अधिक मी जणु ताटीचे अभंग
तु अधिक मी जणु भक्त नामात दंग....
तु अधिक मी जणु श्रावणाची हळुवार चाहूल
तु अधिक मी जणु जोहरची अंजली अन राहुल....
तु अधिक मी जणु अनुरेणुंतुन पाझरनारी प्रिती
तु अधिक मी जणु नवयुगुलांची गोडसर भीती....
तुझ्याविना माझे जगणे, सखे, जगणेच धरत नाही,
आपल्या नात्यामधे असले गणित, मी कधीच करत नाही,
कारण...
तु वजा जाता माझा मीच उरत नाही...
तु वजा जाता माझा मीच उरत नाही...
- अविनाश पेठकर
Subscribe to:
Posts (Atom)