Wednesday, January 23, 2013

बाजार

-----------------------------------------------
बाजार

नकोच वाटे खेळावयाला जीवनाचा रे जुगार आताशा
साव ना उरला कोणी झाला, जो तो चुकार आताशा

बंद खिडक्या, बंदही  दारे, मीच  बंद माझ्याचमध्ये 
घुसमटल्या अशा मनास , राहिला ना शेजार आताशा

निर्व्याज प्रेमास का तोलती 'त्या' पैशांच्या तराजूने ?
गढूळल्या मनास नको वाटती, भावना हळूवार आताशा

दिवसाउजेडी काय काय हे पहावे लागते डोळा
घेतो नित्य मिटूनी डोळे, बरा वाटतो अंधार आताशा

पाप पुण्याचा हिशेब तुही ठेवू लागलास म्हणे देवा
तुझीच ना लेकरे मग का झालास, तू सावकार आताशा?

तूच्छ लेखून सर्व जगा, श्रेष्ठ म्हणूनी हे मिरविती
अशा नगांचा जगात 'अवि', भरला बाजार आताशा!

---------------------------------------------------------------------