Wednesday, May 08, 2013

आजही...!


आजही...!

आजही...!

आपलेच आहेत ते ज्यांनी केलेत वार आजही
शब्द जयांचे घुसलेत हृदयात आरपार आजही

काय सांगू बरेवाईट तुझे, आज मी तुजला?
राहिला का तोच माझा अधिकार.... आजही?

समुद्राएवढी आहे की, आभाळाएवढी नक्की?
उमगत नाही मज या वेदनेचा आकार आजही

काय अप्रुप त्या धनाचे वाटणार सांगा?
'तोच' आहे मी तसाच निर्विकार आजही

विरुन गेली सर्व सुखे जरी गोड स्वप्नांपरी
त्या स्वप्नांचा मनात भरला बाजार आजही

सावलीही आज तुझी, 'अवी', साथ सोडू पाहते...
सोबतीला परी, 'तो', निर्गुण निराकार आजही...!

          ---- अविनाश पेठकर