Saturday, July 25, 2026

रखुमाईचा विठुराया

टाळ-चिपळ्यांचा नाद, बघ आभाळा गेला 

पांडुरंग-वारकरी, आज एकरूप झाला


मोहमायेचे रिंगण, लांघूनी या वारी आलो

तूच माय, बाप तूच, सखा तूच विठ्ठला


धावती पाउले धरूनी, मनी दर्शनाची आस 

नामघोषि देवा तुझीया, हा रोम रोम न्हाला


चंद्रभागा वाळवंट, काठ शरयूचा  भासे!

रखुमाईचा विठुराया, कौसल्येचा राम झाला..


पांडुरंग-वारकरी, आज एकरूप झाला

रखुमाईचा विठुराया, कौसल्येचा राम झाला..


-अविनाश पेठकर
25 जुलै 2026